राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पाच जागांवर दावा , 'या' दिग्गजांची नावे चर्चेत
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पाच जागांवर दावा , 'या' दिग्गजांची नावे चर्चेत
img
वैष्णवी सांगळे
१८ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा केली, त्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण खलबतं सुरु झाली आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या ७ जागांसाठी आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये मोर्चेबांधनीला सुरुवात झाली आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळ पाहता, भाजप या सातपैकी पाच जागा जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावण्याच्या तयारीत आहे.

भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असली तरी, अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या नेत्यांना संधी मिळावी, असा एक मोठा प्रवाह पक्षात पाहायला मिळत आहे. भाजपने पाच जागांवर दावा केला असून, त्यामध्ये मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे नेते रामदास आठवले यांच्या जागेचाही समावेश आहे.

ही नावे आहेत चर्चेत
रामदास आठवले: रिपाई (आठवले गट) प्रमुख.
विनोद तावडे: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस.
विजया रहाटकर: भाजपच्या ज्येष्ठ नेत्या.
भागवत कराड: माजी केंद्रीय राज्यमंत्री.
धैर्यशील पाटील: भाजप नेते.

महाराष्ट्रातून खालील ७ सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या जागा रिक्त होत आहेत.
१. शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस - श.प. गट).
२. रामदास आठवले (रिपाई).
३. फौजिया खान (राष्ट्रवादी काँग्रेस - श.प. गट).
४. रजनी पाटील (काँग्रेस).
५. प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना - उबाठा गट).
६. धैर्यशील पाटील (भाजप).
७. भागवत कराड (भाजप).
इतर बातम्या
Join Whatsapp Group