मुंबई : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठीच्या निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. येत्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. तर 29 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 56 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2024 मध्ये संपत आहे. राज्यसभेतील महाराष्ट्राला एकूण 6 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2024 ला संपत आहे. 27 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.
दरम्यान येत्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार असून, यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील पाच जागा महायुतीच्या वाट्याला येण्याची शक्यता वर्तवली जात. या पाच जागांपैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत.
अशात भाजपकडून राज्यसभेसाठी 9 उमेदवारांच्या नावाची यादी समोर येत असून, ती दिल्लीला पाठवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातून भाजपकडून राज्यसभेसाठी कुणाला उमेदवारी मिळणार याचा अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे.
भाजपकडून दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीत नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया राहटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील आणि संजय उपाध्याय यांचे नावं आहेत. त्यामुळे या नऊ नेत्यांपैकी कोणाच्या गळ्यात राज्यसभेच्या उमेदवारीची माळ पडणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.