धक्कादायक ! सहावीतील विद्यार्थीनीवर ॲसिड हल्ला, मुलीची पहिली प्रतिक्रिया म्हणाली...
धक्कादायक ! सहावीतील विद्यार्थीनीवर ॲसिड हल्ला, मुलीची पहिली प्रतिक्रिया म्हणाली...
img
वैष्णवी सांगळे
अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यात मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. वडगाव पान परिसरात शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या अवघ्या सहावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीने ॲसिड फेकून हल्ला केला. या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. शाळेतून घरी जात असताना अचानक हल्लेखोराने मुलीवर अॅसिड फेकल्याची माहिती समोर येत आहे. हल्ल्यानंतर मुलीने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक तत्काळ धावून आले.

शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केले असून अल्पवयीन मुलीला उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आले आहे. हल्ला करणारा आरोपी अनोळखी असल्याची पहिली प्रतिक्रिया हल्ला झालेल्या मुलीने दिली आहे. तर नातेवाईकांनी आरोपीला पकडून कडक शासन करण्याची मागणी केली आहे. दरम्यान ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ  आज ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. वडगावपानमधील ग्रामस्थांसह सर्वपक्षीय आंदोलनात सहभागी होणार आहे. 

लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. मुलीच्या उजव्या बाजूकडील डोळा व त्याच्या खालील भागावर मोठी इजा झाली आहे. या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या असून आरोपीला पकडण्याच मोठ आव्हान पोलिसांसमोर आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group