टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीनं चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. लग्नाच्या 10 वर्षांनंतर दिव्यांका आई होणार आहे. दिव्यांकानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिनं तिच्या नवऱ्यासोबत आपला बेबी बंप फ्लॉन्ट केलाय.
दिव्यांका आणि विवेक 2016 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. गेल्या अनेक वर्षांपासून, त्यांना बाळाचा विचार कधी करणार, असे प्रश्न सातत्यानं विचारले जात होते. पण, त्या-त्या वेळी दिव्यांका सांगायची की, "जेव्हा ईश्वराची इच्छा असेल, तेव्हाच ती आई बनेल..."दिव्यांका सध्या सहा महिन्यांची गर्भवती आहे. तिची डिलीवरी साधारणपणे जून महिन्याच्या सुमारास होण्याची अपेक्षा आहे. सेलिब्रिटी कपलनं गूड न्यूज शेअर केल्यापासून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
वयाच्या 41 व्या वर्षी दिव्यांका गोंडस बाळाला जन्म देणार असून तिनं तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. दिव्यांकानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिनं तिच्या नवऱ्यासोबत आपला बेबी बंप फ्लॉन्ट केलाय. या फोटोंमध्ये, दिव्यांका आणि तिचा पती अभिनेता विवेक दहिया हे दोघेही पांढऱ्या रंगाच्या आऊटफिट्समध्ये दिसत आहेत. दोघांनीही एकमेकांसोबत Twinning केलंय.
गूड न्यूज शेअर करताना, दिव्यांकानं लिहिलंय की, "10 वर्षांनंतर, आयुष्यात एक रंजक वळण आलंय, काही प्रवास घाईघाईनं पूर्ण करायचे नसतात, तर त्या प्रवासाची तयारी दोघांनी मिळून करायची असते...""आणि अगदी जेव्हा तुम्हाला वाटतं की, तुमची कहाणी पूर्ण झाली आहे, तेव्हाच आयुष्य त्यात सर्वात सुंदर असा एक अध्याय जोडतो...", असंही दिव्यांकानं पोस्टमध्ये लिहिलंय.अजूनही विचारांमध्ये मग्न आणि विनाकारणच चेहऱ्यावर हास्य घेऊन, दिव्यांकानं सर्वांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करत लिहिलंय की, "आम्ही आमच्या बाळाच्या आगमनाची आतुरतेनं वाट पाहत आहोत..."