सोने चांदीला उतरती कळा ! सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण; आजचे भाव काय ?
सोने चांदीला उतरती कळा ! सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण; आजचे भाव काय ?
img
वैष्णवी सांगळे
गुड फ्रायडेच्या दिवशी आज देशात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. आज, शुक्रवार 3 एप्रिलच्या सकाळी, राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,49,110 रुपयांपर्यंत खाली आला आहे. मुंबईत हा भाव प्रति 10 ग्रॅम 1,48,960 रुपये झाला आहे. आदल्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 3500 रुपयांनी किंवा 2.26 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1 लाख 51 हजार 500 रुपयांवर पोहोचला होता. तर आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस 4,591.52डॉलर इतका आहे.



गेल्या महिन्याभरापासून सोने चांदीच्या दरात प्रचंड चढ-उतार सुरू आहेत. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता, मध्यपूर्व भागातील तणाव, युद्धासंबंधी होणारे निर्णय, घोषणा या सगळ्याच्या परिणामामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याचा आधार घेताना दिसत आहेत. दरम्यान महिनाभरापासून सोन्या चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळतेय. 

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमती
मुंबई आणि कलकत्ता : सध्या मुंबईत, कलकत्ता येथे 22 कॅरेट सोन्याचे दर 1,365,40 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,48,960 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

दिल्ली : दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1, 49, 910 आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,36,690 रुपये आहे.

चेन्नई: 24 कॅरेट सोन्याचे दर 1,49, 990 रुपये प्रति 10 ग्राम असून 22 कॅरेट सोन्यासाठी 1,37,490 रुपये मोजावे लागत आहेत.

पुणे आणि बंगळुरू : या दोन शहरांमध्ये, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 148960 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 136540 रुपये आहे.

तर आज चांदी या आणखी एका मौल्यवान धातूच्या किमतीतही घसरण होताना दिसली. ३ एप्रिलच्या सकाळी, चांदीची किंमत प्रति किलोग्राम 22, 49,900 रुपयांपर्यंत घसरली. आदल्या दिवशी, दिल्ली सराफा बाजारात चांदीची किंमत 9000 रुपयांनी, म्हणजेच 3.66 क्क्यांनी घसरून प्रति किलोग्राम 2,37,000 रुपयांवर आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव प्रति औंस 69.57 डॉलर आहे. यावर्षी जानेवारीमध्ये चांदीच्या किमतीने 4 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group