मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कमांडो शहीद
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कमांडो शहीद
img
Dipali Ghadwaje

मैतेई आणि कुकी या दोन समुदायांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाचा भडका शमताना दिसत नाहीय. मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला आहे. कुकी अतिरेकी आणि पोलिसांमध्ये गोळीबार झाला. ज्यामध्ये एक कमांडो मारला गेलाय. टेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह या सीमावर्ती शहरात सुरक्षा दल आणि संशयित कुकी दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळतेय.  

यामध्ये एका पोलीस कमांडोचा मृत्यू झाला आहे. पोलीस कर्मचाऱ्याला गोळी लागल्याची माहिती मिळतेय. सध्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संशयित कुकी अतिरेक्यांनी एसबीआय मोरेह शहराजवळील सुरक्षा चौकीवर बॉम्ब फेकले आणि गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलाने ही कारवाई केली आहे. डब्ल्यू सोमोरजीत असं मृताचे नाव आहे. तर आणखी एक कमांडो जखमी झाला आहे. वॉर्ड 7 जवळ दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. हा गोळीबार एक तासाहून अधिक काळ सुरू होता.

मोरेह येथील पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली होती. मणिपूर सरकारने  शांततेचा भंग, सार्वजनिक शांतता बिघडवणे आणि तेंगनौपालच्या महसूल प्राधिकरण क्षेत्रात मानवी जीवन आणि मालमत्तेला गंभीर धोका निर्माण होण्याच्या भीतीने जिल्ह्यात संपूर्ण कर्फ्यू लागू केला आहे. या कर्फ्यू दरम्यान जीवनावश्यक वस्तू उपलब्ध राहणार आहेत.

स्थानिक पोलिसांनी फिलिप खोंगसाई आणि हेमोखोलाल माटे यांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एसडीपीओ सीएच आनंद यांच्या हत्येप्रकरणी अटक केली होती. या दोघांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर गोळीबार केला होता, त्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले.

मणिपूरमध्ये सुरक्षा दल आणि कुकी दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन संशयितांना अटक केल्यानंतर 48 तासांनंतर पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. यात एक जवानही  शहीद झाला आहे. मणिपूर सरकारने 16 जानेवारी रोजी सकाळी 12 वाजल्यापासून संपूर्ण कर्फ्यू लागू केलाय.  

इतर बातम्या
Join Whatsapp Group