मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा : तीन दिवसांत मणिपूरमध्ये पाच ठार,18 जण जखमी
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा : तीन दिवसांत मणिपूरमध्ये पाच ठार,18 जण जखमी
img
Dipali Ghadwaje
इंफाळ : मणिपूरमधील हिंसाचार काही थांबण्याचं नाव घेत नाही. मणिपूरच्या बिष्णूपूर आणि चुराचांदपूर जिल्ह्यात कुकी आणि मैतेई समुदायात संघर्ष सुरूच असून गेल्या ७२ तासांत झालेल्या धुमश्‍चक्रीत पाच जणांचा मृत्यू तर १८ जण जखमी झाले आहेत. बिष्णूपूर जिल्ह्यातील खोरेईतक आणि चुराचांदपूर जिल्ह्यातील चिंगफेई आणि खौशाबंग भागात गोळीबार सुरूच असून नागरिक जखमी होत आहेत.

याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, (31 ऑगस्ट) रोजी मणिपूच्या बिष्णुपूरमध्ये आणि चुराचांदपूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही तासांपासून दोन समूहांमध्ये सातत्याने गोळीबार होत आहे. यामध्ये किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 18 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.बिष्णुपूर जिल्ह्यातील खोराईंतकच्या पायथ्याशी आणि चुराचंदपूर जिल्ह्यातील चिंगफेई आणि खौसाबुंग भागात गोळीबार झाला. मंगळवार (29 ऑगस्ट) रोजी खोइरेंटक भागात झालेल्या गोळाबारामध्ये एका 30 वर्षीय समाजसेवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर या भागातील हिंसाचार वाढत गेल्याचा सांगण्यात आलं आहे. 

मंगळवारी (29 ऑगस्ट) बिष्णुपूरच्या नारायणसेना गावाजवळ झालेल्या हिंसाचारामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले होते. दरम्यान इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम ने तात्काळ बंद देखील पुकारला. बुधवारी संध्याकाळी काही तासांच्या शांततेनंतर गुरुवारी (31 ऑगस्ट) सकाळी पुन्हा दोन गटांमध्ये गोळीबार सुरु झाला, त्याच तिघांनी प्राण गमावले. दरम्यान जरी काही जिल्ह्यांमध्ये बंद पुकारण्यात आला असला तरीही अत्यावश्यक सेवा या सुरुच राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

पोलिसांकडून तपास सुरु
मणिपूर पोलिसांनी ट्वीट करत यासंबंधी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, कांगपोकपी, थौबल, चुराचंदपूर आणि इंफाळच्या काही भागांमध्ये सुरक्षारक्षकांनी शोध मोहीम राबवली आहे. या मोहिमेमध्ये शस्त्र, दारुगोळा, स्फोटके आणि इतर काही साहित्य सापडले आहे. सध्या मणिपूरमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 130 अतिरिक्त पोलीस चौकी देखील स्थापन करण्यात आल्या आहेत. तर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आतापर्यंत 1,646 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group