मोठी बातमी ! आंदोलन तापलेलं असताना दिल्लीत इंटरनेट सेवा बंद
मोठी बातमी ! आंदोलन तापलेलं असताना दिल्लीत इंटरनेट सेवा बंद
img
Nandini khandare More
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नीट पेपरफुटीचे प्रकरण फास्ट-ट्रॅक कोर्टात चालवले जाणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, कॉकरोच जनता पार्टीला कोणत्याही परिस्थितीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे.

देशातील अनेक शहरात आंदोलने सुरू आहेत.  मात्र, सरकारकडून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही. आंदोलक अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. दिल्लीतील काही मेट्रो स्टेशन देखील बंद ठेवण्यात आलीत. आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे आल्याने खळबळ उडाली.

पाकिस्तानच्या काही सोशल मीडिया अकाऊंटवरून तरूणांची माथी भडकवणारी व्हिडीओ व्हायरल केली जात आहेत. त्यामध्येच आता दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. कोणत्याही प्रकारचे भडकावू भाषण आणि व्हिडीओ व्हायरल होऊ नयेत, याकरिता दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. हा अत्यंत मोठा निर्णय म्हणावा लागेल. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group