मोठं संकट टळल! पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या उल्केचा हवेत स्फोट
मोठं संकट टळल! पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या उल्केचा हवेत स्फोट
img
दैनिक भ्रमर
गेल्या दोन दिवसांपासून सर्व भारतीय श्रीराम मंदिराचा आनंदोत्सव साजरा करत आहेत. यादरम्यान पृथ्वीच्या दिशेने येणारे मोठे संकट टळले आहे. 21 जानेवारी 2024 रोजी जर्मनीची राजधानी बर्लिनच्या आकाशात एका उल्कापिंडाचा स्फोट झाला. धक्कादायक बाब म्हणजे, पृथ्वीच्या वातावरणात आल्यानंतर शास्त्रज्ञांना याची माहिती मिळाली. ही उल्का पृथ्वीवर कोसळली असती, तर बर्लिन शहर आणि आजूबाजूला परिसरात मोठा विध्वंस झाला असता.

एखादी उल्का पृथ्वीच्या दिशेने येत असेल, तर शास्त्रज्ञांना आधीच माहिती मिळते. पण, पृथ्वीच्या वातावरणात आल्यानंतर उल्का दिसण्याची ही आठवी वेळ आहे. बर्लिनजवळील लाइपझिग नावाच्या परिसरात ही उल्का दिसली. पण, सुदैवाने पृथ्वीवर कोसळण्यापूर्वीच या उल्काचा स्फोट झाला. पृथ्वीवर कोसळल्यानंतर या उल्केमुळे मोठी घटना घडली असती. आता शास्त्रज्ञ याचे तुकडे शोधत आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, ही घटना 21 जानेवारी पहाटे घडली. अचानक एक तेजस्वी प्रकाश आभाळ चिरत पृथ्वीच्या दिशेने येत होता. पण, अचानक या उल्काचा हवेत स्पोट झाला आणि ती कुठेतरी अदृश्य झाली. शास्त्रज्ञांनी सांगितले की, सुदैवाने ही लहान आकाराची उल्का होती. जर ती मोठ्या आकाराची उल्का किंवा एखाद्या धातूपासून बनलेली उल्का असती, तर भयंकर विध्वंस झाला असता. ही उल्का समुद्रात पडली असती, तर त्सुनामीने अनेक शहरांना फटका बसला असता.

2013 मध्ये रशियात घडलेली घटना युरोपियन स्पेस एजन्सीने सांगितले की, 99 टक्के उल्का धोकादायक नसतात. बहुतांश उल्का 98 फुटांपेक्षा लहान असतात. लहान उल्का शोधणे आणि त्यांचा मार्ग आणि ड्रॉप पॉइंट शोधणे सोपे नाही. 2013 मध्ये रशियातील शेलियाबिन्स्कमध्ये एक उल्का वेगाने कोसळली होती. यामुळे संपूर्ण शहरातील इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या. तसेच, लोकांना काही सेकंद दिसनेही बंद झाले होते. उल्केच्या गर्मीमुळे 1600 लोक जखमी झाले होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group