फटाका फॅक्टरीत भीषण आग; ७ जणांचा होरपळून मृत्यू तर ५० हुन अधिक जखमी
फटाका फॅक्टरीत भीषण आग; ७ जणांचा होरपळून मृत्यू तर ५० हुन अधिक जखमी
img
दैनिक भ्रमर
मध्य प्रदेशातल्या हरदा जिल्ह्यातल्या एका फटाका फॅक्टरीत स्फोट झाल्याने भीषण आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर ५० हून अधिक लोक होरपळले आहेत. या सगळ्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आहे. मदत आणि बचावकार्यही सुरु आहे. या घटनेनंतर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आपात्कालीन बैठक बोलावली असून ते या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. या फॅक्टरीत फटाके असल्याने आग वारंवार भडकते आहे.

कारखान्यातील लोकांना सोडवण्यासाठी SDRF ची टीम पोहचली आहे. तसंच घटनास्थळी रुग्णवाहिकाही दाखल झाल्या आहेत. अनेक जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. आगीचे भलेमोठे लोळ आणि धुराचे प्रचंड लोट या ठिकाणी दिसत आहेत. तसंच लोक जिवाच्या आकांताने पळतानाही दिसत आहेत. या ठिकाणी अग्निशमन दलाचे लोक पोहचले असून ते आग नियंत्रणात आणण्यासाठीही प्रयत्न करत आहेत. कारण त्यानंतरच बचावकार्य करता येणार आहे. 

हरदामध्ये झालेल्या या दुर्घटनेनंतर नर्मदापुरम आणि बैतूर या ठिकाणांहूनही एसडीआरएफचं पथक आणि मदतीचं साहित्य पाठवण्यात आलं आहे. तसंच नर्मदापुरम या ठिकाणाहून तीन रुग्णवाहिका आणि सहा अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या आहेत. तसंच एसडीआरएफचे १९ जवानही पोहचले आहेत.


मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर केली आहे. तसंच जे लोक या घटनेत जखमी झाले आहेत त्यांच्या उपचारांचा सगळा खर्च राज्य सरकार करणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group