एलआयसी बनली जगातील सर्वात मजबूत विमा कंपनी, दिग्गज कंपन्यांना टाकलं मागे
एलआयसी बनली जगातील सर्वात मजबूत विमा कंपनी, दिग्गज कंपन्यांना टाकलं मागे
img
Dipali Ghadwaje
भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ने मोठा विक्रम केला आहे. जगातील अनेक दिग्गज विमा कंपन्यांना मागे टाकत, विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LIC ही जागतिक स्तरावर मजबूत विमा कंपनी म्हणून उदयास आली आहे. LIC जगातील सर्वात मजबूत विमा ब्रँड बनला आहे. 

दरम्यान, ब्रँड फायनान्स इन्शुरन्सचा अहवाल प्रसिद्ध झालाय. या अहवालामध्ये LIC ला सर्वोच्च रेट देण्यात आल्याची माहिती देण्यात आलीय. LIC ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC चे ब्रँड व्हॅल्यू 9.8 अब्ज डॉलर असल्याची माहिती या अहवालात देण्यात आलीय. 

या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, कॅथी लाइफ इन्शुरन्स या कंपनीला दुसरे स्थान मिळाले आहे. तर NRMA इन्शुरन्स कंपनीला तिसरे स्थान मिळाले आहे. दरम्यान, LIC आता देशातीलच नाही तर जगातील सर्वात मजबूच ब्रँड ठरला आहे. ब्रँड व्हॅल्यूमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. याचा फायदा विमा कंपनीला होता आहे. 

दिवसेंदिवस LIC या विमा कंपनीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारात आहे. तसेच लोकांची विश्वासर्हता यावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं लोक गुंतवणूक करत आहेत. दरम्यान, 2023 मध्ये LIC या विमा कंपनीला प्रिमीयम म्हणून 39,090 कोटी रुपये मिळाले होते. तर SBI लाईफ इन्शुरन्सला 15,197 कोटी रुपयांचा प्रिमीयम मिळाला होता. HDFC लाइफ इन्शुरन्स कंपनीला 10970 कोटी रुपयांचा प्रिमीयम मिळाला होता. 

दरम्यान, LIC आपल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देखील सतर्क आहे. अलीकडेच सरकारनं LIC कर्मचाऱ्यांच्या पगारात 17 टक्क्यांची वाढ केली आहे.

 LIC ही देशातील भारत सरकारची सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसी या कंपनीवर पूर्णपणे मालकी हक्क हा सरकारचा आहे. गेल्या अनेक काळापासून LIC हा भारतीय समाजाचा अत्यंत महत्वाचा घटक बनला आहे. दिवसेंदिवस LIC चा व्यवसाय विस्तारत असल्याचं चित्र देखील दिसत आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group