विमाधारकांना मोठा दिलासा मिळणार! मोदी सरकार घेणार
विमाधारकांना मोठा दिलासा मिळणार! मोदी सरकार घेणार "हा" मोठा निर्णय
img
Dipali Ghadwaje
तुम्ही जर आरोग्य विमा पॉलिसी घेतली असेल किंवा येत्या काही दिवसांत ती खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार 30,000 रुपयांपर्यंतच्या आरोग्य विम्याच्या प्रीमियमवरील जीएसटी कमी करण्याचा विचार करत आहे. सरकार सध्याच्या 18 टक्के जीएसटी दरावरून 12 टक्के करण्याचा विचार करत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य विमा अधिक परवडणारा आणि आकर्षक बनवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. सध्या 30 हजार रुपयांपर्यंतच्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये कुटुंबातील चार सदस्यांना 10 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळू शकते. 

बातमीनुसार, एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की जीएसटीमध्ये कपात करण्याच्या निर्णयामुळे प्रीमियम दर कमी करण्यास मदत होईल किंवा हेल्थ कव्हर पर्यायामध्ये अतिरिक्त फायदे मिळतील. ते लोकांच्या गरजेवर अवलंबून असेल. अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की हा एक प्रलंबित प्रस्ताव आहे ज्यावर लोकसभा निवडणूक 2024 पूर्ण झाल्यानंतर निर्णय घेतला जाऊ शकतो. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group