1 एप्रिलपासून होणार 'हे' मोठे बदल, तुमच्या खिशाला कात्री लागणार का? जाणून घ्या संपूर्ण माहिती
1 एप्रिलपासून होणार 'हे' मोठे बदल, तुमच्या खिशाला कात्री लागणार का? जाणून घ्या संपूर्ण माहिती
img
Dipali Ghadwaje
31 मार्च रोजी 2023-24 हे आर्थिक वर्ष संपणार आहे. नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. अशातच येणारा 1 एप्रिल अनेक नवीन बदल घेऊन येणार आहे. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल.  

येत्या 1 एप्रिलपासून एनपीएसच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत आणि क्रेडिट कार्डच्या नियमांमध्येही बदल होणार आहेत. यातच जर तुम्ही फास्टॅग वापरत असाल तर तुम्हाला यासंबंधित काही महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. तसं न केल्यास 1 एप्रिलपासून तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. देशात 1 एप्रिलपासून कोणते बदल लागू होणार आहे जाणून घ्या. 
 
नॅशनल पेन्शन सिस्टिम
पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली सुरक्षित करण्यासाठी आधार आधारित टू स्टेप ऑथेंटिकेशन सिस्टिम सुरू केली आहे. याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार आहे. 

एसबीआय क्रेडिट कार्ड
एसबीआयच्या काही क्रेडिट कार्ड्सवरील पेमेंटवर मिळणारे रिवॉर्ड पॉइंट्स 1 एप्रिल 2024 पासून मिळणे बंद होणार. यामध्ये AURUM, SBI Card Elite, SBI Card Elite Advantage, SBI Card Pulse आणि SimplyClick कार्डांचा समावेश आहे.

फास्टॅग ई-केवायसी
जर तुम्ही अजून तुमच्या फास्टॅगचे ई-केवायसी केले नसेल, तर अशातच तुम्ही 31 मार्चआधी त्याचे ई-केवायसी करून घ्यावे. जर तुम्ही हे केले नाही. तर तुम्हाला 1 एप्रिलपासून फास्टॅग वापरताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

एलपीजी गॅस सिलेंडर
एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलतात. अशातच 1 एप्रिलपासून एलपीजी गॅसच्या किमतीत बदल होऊ शकतो.

 
Rules |
इतर बातम्या
Join Whatsapp Group