अरविंद केजरीवाल यांना पुन्हा तुरुंगवास
अरविंद केजरीवाल यांना पुन्हा तुरुंगवास
img
दैनिक भ्रमर
कथित मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आज अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडीची मुदत संपत आहे. अशातच केजरीवाल यांची १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. राऊज एव्हीन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. .
 
याबाबात अधिक माहिती अशी की, कथित मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या ईडी कोठडीत आहेत. अरविंद केजरीवाल  यांची ईडी कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा राऊज एव्हीन्यू कोर्टात हजर करण्यात आले. सकाळी ११.३० वाजता या प्रकरणावर सुनावणी सुरू झाली असून कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना कोणताही दिलासा न देता त्यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मागच्या सुनावणी वेळी केजरीवाल यांनी स्वतः युक्तिवाद करत आपल्याला या प्रकरणात कसे अडकवले आहे हे कोर्टाला सांगितले होते. कोर्टाने यासंबंधी ईडीला नोटीस पाठवत उत्तर सादर करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. परंतु आजच्या सुनावणीनंतर कोर्टाने त्यांची १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.


तिहार जेलमध्ये रवानगी होणार?

दरम्यान, दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आज जेल अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तिहार जेलमध्ये रवानगी करण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार पाच नंबर जेलची स्वच्छता करण्यात आली असून केजरीवाल यांना तिहार जेलमध्ये हलवल्यास त्यांना पाच नंबर मध्ये ठेवलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group