माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ३३ वर्षानंतर राज्यसभेतून निवृत्त
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ३३ वर्षानंतर राज्यसभेतून निवृत्त
img
दैनिक भ्रमर
राज्यसभेत ३३ वर्षांची कारकिर्द गाजवल्यानंतर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग निवृत्त होत आहेत. त्यांच्यासोबतच राज्यसभेच्या ५४ खासदारांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. यापैकी अनेक जण लोकसभा निवडणूक लढवत आहेत, तर काही खासदार असे आहेत जे पुन्हा राज्यसभेत नियुक्ती होऊत परतत आहेत.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ३  एप्रिल रोजी राज्यसभेतून निवृत्त होत आहेत तर काँग्रेसच्या माजी अध्यक्षासोनिया गांधी पहिल्यांदाच राज्यसभेवर जात आहेत. सोनिया आतापर्यंत लोकसभेच्या खासदार राहिल्या आहेत. मात्र यावेळी त्यांनी रायबरेलीतून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला.

शरद पवार पक्षाची आज दुसरी यादी जाहीर होणार ; कोण कोठून लढणार?

मनमोहन सिंग १९९१ मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर 

डॉ. मनमोहन सिंग यांना देशातील उदार आर्थिक धोरणासाठी ओळखले जाते. १९९१ मध्ये पहिल्यांदा ते राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांनी पीव्ही नरसिम्हा राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्रीपद सांभाळले होते. त्यानंतर ते २००४ ते २०१४ पर्यंत १० वर्षे भारताचे पंतप्रधान होते. सध्या ते ९१ वर्षांचे आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group