शरद पवार पक्षाची आज दुसरी यादी जाहीर होणार ; कोण कोठून लढणार?
शरद पवार पक्षाची आज दुसरी यादी जाहीर होणार ; कोण कोठून लढणार?
img
दैनिक भ्रमर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. शरद पवार गटाकडून (Sharad Pawar) उमेदवारांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे, तर आज दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार गटाच्या दुसऱ्या यादीत रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा या पाच जागांचे उमेदवार दुसऱ्या यादीतून जाहीर होण्याची शक्यता आहे.  

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी (मंगळावारी) जाहीर केली. लोकसभेच्या 5 उमेदवारांची घोषणा पहिल्या यादीतून करण्यात आली. आज शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर केली जाणार आहे. या यादीतून 5 लोकसभा जागांवरील उमेदवारींची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून दुसरी यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

कपड्याच्या दुकानाला भीषण आग ; 7 जणांचा गुदमरून मृत्यू

शरद पवार गटाच्या पहिल्या यादीत कोणाला उमेदवारी? 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे, शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके, वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्करराव भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. 

साताऱ्यातून श्रीनिवास पाटलांनीच लढावं, शरद पवार गटातील वरिष्ठ नेत्यांची भूमिका 

सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षच लढणार आहे. इथून लढण्यास श्रीनिवास पाटील यांनी नकार दिला आहे. मात्र, आता त्यांनीच इथून लढावं, असा आग्रह केला जात आहे. महायुतीविरोधात श्रीनिवास पाटील हेच चांगला लढा देऊ शकतील अशी वरिष्ठ नेत्यांची भूमिका आहे.  दरम्यान, सातारा लोकसभेच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली आहे. तब्येत ठीक नसल्यानं मी निवडणूक लढवू इच्छित नाही, असं पाटील यांनी शरद पवारांना कळवलं आहे. त्यामुले आता लोकसभेसाठी उमेदवार कोण असावा? याबाबत शरद पवार गटाकडून खलबतं सुरू आहेत. एकीकडे श्रीनिवास पाटलांची मनधरणी सुरू असून दुसरीकडे जर श्रीनिवास पाटील आपल्या निर्णयावर ठाम राहिले, तर मात्र लोकसभेला कोणाला रिंगणात उतरवायचं? याची चाचपणी शरद पवार गटाकडून सुरू आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group