आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. या तिसऱ्या यादीमध्ये एकूण नऊ उमेदवार असून सर्व तमिळनाडू राज्यातील आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री एल. मुरुगन, प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई, माजी राज्यपाल तमिलीसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चितीसाठी घाई केली आहे. भाजपने मात्र यामध्ये आगेकूच करत याआधी २ मार्चला पहिल्या यादीत १९५ आणि १३ मार्चला दुसऱ्या यादीत ७२ उमेदवारांची घोषणा केली. त्या पाठोपाठ गुरुवारी (२१ मार्च) भाजपने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये एकूण नऊ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून हे सर्व उमेदवार तामिळनाडू राज्यातील आहेत.
'या' नऊ उमेदवारांमध्ये यांचा समावेश
भाजपने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत चेन्नई दक्षिणमधून तमिलीसाई सुंदरराजन, मध्य चेन्नईमधून विनोज पी. सेल्वम, वेल्लोरमधून डॉ. ए. सी. शणमुगम, कृष्णागिरीमधून सी. नरसिम्हा, निलगिरीमधून एल. मुरुगन, कोइंबतूरमधून के. अन्नमलाई, पेरंबलुरुमधून टी. आर. पारिवेंधर, तिरूनेलवेळीमधून नयणार नागेंद्रन आणि कन्याकुमारीमधून पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.