मोठी बातमी : रविंद्र वायकरांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा ; अमोल किर्तीकरांची याचिका कोर्टाने फेटाळली
मोठी बातमी : रविंद्र वायकरांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा ; अमोल किर्तीकरांची याचिका कोर्टाने फेटाळली
img
Dipali Ghadwaje
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत दिलेल्या निकालाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर  यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याची उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा 48 मतांनी  विजय झाला होता. तर अमोल कीर्तीकर यांना पराभव स्वीकाराला लागला होता.

मतमोजणी प्रक्रियेत गोंधळ झाल्याची तक्रार अमोल कीर्तीकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका आता मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

6 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची निवडणूक झाली होती. त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार उमेदवार रवींद्र वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव केला होता.

त्यामुळे अमोल किर्तीकर यांनी मतमोजणीत घोळ असल्याचा आरोप करत रवींद्र वायकर यांना अपात्र करावे अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.

याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने  सुनावणी पूर्ण केली होती. याचा निर्णय राखून ठेवला होता. या निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अखेर आज न्यायालयानं अमोल किर्तीकर यांची याचिका फेटाळून लावली आहे. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group