तरुणांसाठी सुवर्णसंधी ! मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांची भरती
तरुणांसाठी सुवर्णसंधी ! मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांची भरती
img
Jayshri Rajesh
तरुणांसाठी भरघोस पगारासह सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. २ मुंबई उच्च न्यायालयात रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारद्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे. १३ व्या वित्त आयोगाअंतर्गत मानधनाच्या नियमांनुसार ही भरती जारी केली असून या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात मुंबई उच्च न्यायालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी असल्यामुळे इच्छुक तरुणांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा.  

मुंबई उच्च न्यायालयात पात्र तरुणांना महाव्यवस्थापक पदासाठी नोकरीची संधी मिळत आहे. या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून उमेदवारांना आपले अर्ज https://bombayhighcourt.nic.in/ अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत. उमेदवारांसाठी ९ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

वय व शैक्षणिक पात्रता

या नोकरीसाठी २५ ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही संधी आहे. या नोकरीसाठी एमबीए किवा डिप्लोमा पदवी असणे आवश्यक आहे. त्यांना ५ वर्षांचा अनुभव आणि प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. व्यवस्थापन, आयटी व्यवस्थापन, एचआर याचे शिक्षण झालेले असावे. सरकारी संस्था किवा प्रतिष्ठित कंपनीत कामाचा किमान ८ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. ज्या उमेदवाराकडे कायद्याची पदवी आहे त्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल. यासाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेत पात्र ठरल्यानंतर १०० गुणांच्या परीक्षेसाठी बोलवण्यात येईल. पात्र उमेदवारांना ५७ हजार ५०० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group