मोठी बातमी : होमगार्ड पदासाठी मेगा भरती, 10 हजारांहून अधिक जागांसाठी भरती सुरू
मोठी बातमी : होमगार्ड पदासाठी मेगा भरती, 10 हजारांहून अधिक जागांसाठी भरती सुरू
img
दैनिक भ्रमर
मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. युवकांसाठी मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. दहावी पास असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 10 हजाराहून पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही आरामात आॅनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागेल. होमगार्डसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरती प्रक्रिया डायरेक्ट्रेट जनरल ऑफ होम गार्ड्स, गवर्नमेंट ऑफ एनसीटी ऑफ दिल्ली यांच्याकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना अर्ज ही करावी लागणार आहेत.

उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. dghgenrollment.in. या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. याच साईटवर तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही आरामात मिळेल. dghgenrollment.in. या साईटवर जाऊन तुम्ही उद्यापासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकता.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी लक्षात ठेवावा की, उमेदवाराला तीन वर्षांसाठीच ही नोकरी मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 20 ते 45 दरम्यान असणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा, फिजिकल आणि मेजरमेंट टेस्ट देखील द्यावी लागणार आहे. बारावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. एक्स ससर्विसमॅन आणि एक्स सीएपीएफ दहावी पास असलेले उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 13 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करावी लागणार आहेत.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group