राज्य सरकारचा मोठा निर्णय, 'या' विभागातील ६५० पदांसाठी घेणार फेरपरीक्षा ; अश्या असतील परीक्षेच्या तारखा
राज्य सरकारचा मोठा निर्णय, 'या' विभागातील ६५० पदांसाठी घेणार फेरपरीक्षा ; अश्या असतील परीक्षेच्या तारखा
img
Dipali Ghadwaje
मुंबई : सध्या देशपातळीवर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या नीट या परीक्षेच्या आयोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे नेट ही परीक्षादेखील रद्द करण्यात आलेली आहे. या साऱ्या परिस्थितीमुळे वेगवेगळ्या प्रवेशपरीक्षा आणि भरती प्रक्रियांच्या आयोजनांवर शंका घेतली जात आहे. असे असतानाच आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

सरकारने मृद व जलसंधारण विभागातील गट-ब संवर्गातील 650 पदांसाठीची फेर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. 14, 15, 16 जुलै रोजी होणार परीक्षा होणार आहे. 

राज्य सरकारच्या मृद व जलसंधारण विभागाने या निर्णयाचे एक परित्रक प्रसिद्ध केले आहे. या परीपत्रकानुसार जुलै महिन्यात ही परीक्षा होणार असून ही परीक्षा पारदर्शक व्हावी या अनुशंगने 7 शहरातील टीसीएस-आयओएन कंपनीच्या 10 अधिकृत केंद्रावरच घेतली जाणार आहे. 

TCS च्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील केंद्रावर 14, 15, 16 जुलै रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे.

अमरावतीत झाला होता गैरप्रकार

फेब्रुवारी महिन्यात या पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र अमरावती शहरातील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्याचे निदर्शनास आले होते. या घटनेची गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन सरकारने ही परीक्षाच रद्द केली. आता हीच परीक्षा पुन्हा एकदा  TCS कंपनीच्या परीक्षा केंद्रावर होणार आहे. तसा निर्णय घेण्यात आला आहे. 

दरम्यान यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडून आल्यास संबधितास जबाबदार ठरवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना मंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group