लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज! राज्यातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज! राज्यातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
img
दैनिक भ्रमर
आज देशभरात दुसऱ्या टप्प्याच मतदान होणार आहे. देशात 88 तर राज्यात 8 मतदारसंघात मतदान होणार आहे. एकूण 12 राज्यात आज मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. राज्यात  आज विदर्भातले बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यातले हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान होईल. अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या केरळातल्या वायनाड मतदारसंघात आज मतदान होणार आहे.

राहुल गांधींविरोधात वायनाडमध्ये भाजपचे के. सुरेंद्रन आणि सीपीआयच्या अॅनी राजा या रिंगणात आहेत. त्याशिवाय मथुरेतून हेमामालिनी, कोटा बुंदी या राजस्थानातल्या मतदारसंघातून मावळते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राजनांदगावमधून भुपेश बघेल, तिरूअनंतपुरममधून शशी थरूर, दक्षिण बंगळुरूतून भाजपचे तेजस्वी सूर्या, मेरठमधून भाजपचे अरूण गोविल यांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर तिरुअनंतपुरममधून निवडणूक लढवत आहेत. येथे त्यांची स्पर्धा काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याशी आहे. जम्मू लोकसभा जागेवर भाजपचे जुगल किशोर आणि काँग्रेसचे रमण भल्ला आहेत. 

मतदान केंद्र अधिकारी आणि सर्वच यंत्रणा सज्ज

 दुसऱ्या टप्प्यात केरळमधील सर्व 20, कर्नाटकातील 14, राजस्थानमधील 13, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी 8, मध्य प्रदेशातील 6, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी 5, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 3 आणि जम्मू-काश्मीर आणि त्रिपुरामधील 1 जागेचा समावेश आहे. याशिवाय मणिपूरचा 1 भाग म्हणजे मणिपूर बाह्य सीट.  लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. मात्र सकाळी 6 वाजता मॉक पोलला सुरुवात झाली. ईव्हीएम व्यवस्थित काम करतंय की नाही हे यातून तपासलं जातं.  दरम्यान मतदान केंद्र अधिकारी आणि सर्वच यंत्रणा सज्ज आहे.  

दुसऱ्या टप्प्यातील लढती

 महाराष्ट्रात कुठे होणार मतदान आणि उमेदवार 

 बुलढाणा-  प्रतापराव जाधव (शिवसेना) विरुद्ध नरेंद्र खेडेकर (उबाठा)  
अकोला- अनूप धोत्रे (भाजप) विरुद्ध अभय पाटील (काँग्रेस) विरुद्ध प्रकाश आंबेडकर (वंचित)
अमरावती- नवनीत कौर राणा (भाजप) विरुद्ध बळवंत वानखडे (काँग्रेस) विरुद्ध आनंदराज आंबेडकर (रिपब्लिकन सेना) विरुद्ध दिनेश बूब (प्रहार)
वर्धा- रामदास तडस (भाजप) विरुद्ध अमर काळे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)  
 यवतमाळ- वाशिम- राजश्री पाटील (शिवसेना) विरुद्ध संजय देशमुख (उबाठा) 
 हिंगोली- बाबूराव कदम कोहळीकर (शिवसेना) विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर (उबाठा) शिवाजी जाधव (भाजप बंडखोर)
नांदेड- प्रतापराव पाटील चिखलीकर (भाजप) विरुद्ध वसंतराव चव्हाण (काँग्रेस)
परभणी- महादेव जानकर (राष्ट्रवादी) विरुद्ध संजय जाधव (उबाठा)
इतर बातम्या
Join Whatsapp Group