
२१ मार्च २०२४
काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीत पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरहून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली असून नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
काँग्रेसकडून 57 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्रातील एकूण 7 उमेदवारांचा त्यात समावेश आहे. काँग्रेस महाराष्ट्रात 48 पैकी एकूण 18 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उर्वरित उमेदवारांची घोषणा देखील लवकरच होण्याची शक्यता आहे.
यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://twitter.com/INCIndia/status/1770839346016305189?t=ryVH5SwenYGILeqGPWJHQg&s=19
Copyright ©2025 Bhramar