भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे काल (26 डिसेंबर) वृद्धापकाळाने निधन झालं. दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रात्री 9.41 वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशावर शोककळा पसरली आहे. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर करण्यात आला. या काळात देशातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी अंत्यदर्शन घेण्यासाठी राजकीय नेते मंडळी गर्दी करताना दिसत आहे. काल रात्री एम्समधून त्यांचे पार्थिव येथे आणण्यात आले.
+98-*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर भारत सरकारने ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. येत्या १ जानेवारी २०२५ पर्यंत हा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे. या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल. तसेच कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या (शनिवारी) सकाळी 10-11 दरम्यान अंत्यसंस्कार होणार आहेत. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीतील राजघाटावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी काही विशेष प्रोटोकॉल पाळण्यात येणार आहेत.
मनमोहन सिंग यांची मुलगी आज रात्री उशिरा अमेरिकेहून दिल्लीला पोहोचेल. यानंतर त्यांचे पार्थिव उद्या 28 डिसेंबर रोजी काँग्रेस मुख्यालयात आणले जाईल. या ठिकाणी काँग्रेस नेते आणि दिग्गज नेते त्यांना श्रद्धांजली वाहतील. यानंतर त्यांच्या पार्थिवावर राजघाटाजवळ अंत्यसंस्कार केले जातील.
माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्कारावेळी विशिष्ट प्रोटोकॉलचे पालन
देशाच्या माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्कारावेळी एका विशिष्ट प्रोटोकॉलचे पालन केले जाते. यावेळी त्यांनी देशासाठी दिलेले योगदान आणि त्यांच्या पदाचा गौरव करण्यात येतो. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी माजी पंतप्रधानांच्या पार्थिवावर राष्ट्रध्वज तिरंगा ठेवला जातो. यानंतर अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना २१ तोफांची सलामी दिली जाते. यावेळी सुरक्षा आणि प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले जाते. यावेळी लष्करी बँड आणि सशस्त्र दलाचे जवानही अंत्ययात्रेत सहभागी होतात.