हरभजन सिंगने टी-२० विश्वचषकासाठी निवडला संघ ; 'या' दोन बड्या खेळाडूंना डच्चू
हरभजन सिंगने टी-२० विश्वचषकासाठी निवडला संघ ; 'या' दोन बड्या खेळाडूंना डच्चू
img
दैनिक भ्रमर
आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धा 2 जूनपासून सुरू होणार असून या महिन्याच्या अखेरीस भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. याआधी भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघातील 15 जणांची निवड केली आहे. यामध्ये अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि यष्टीरक्षक केएल राहुलला स्थान दिलेले नाही.

हरभजन सिंगने सलामीवीर म्हणून कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जैस्वालला निवडले आहे. तर तिसऱ्या नंबरवर विराट कोहलीची निवड केली आहे. याचसोबत हरभजन सिंगने सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रिंकू सिंग आणि संजू सॅमसनवर विश्वास दाखवला आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून शिवम दुबे आणि रवींद्र जडेजाची निवड केली आहे. यासोबत गोलंदाजीमध्ये कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, आवेश खान, अर्शदीप सिंग, मयंक यादव यांची निवड केली आहे. 

संघ निवडताना संतुलन राखणं महत्त्वाचं

आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारतीय संघाला महत्वाचा गुरुमंत्र दिला आहे. भारतीय संघाने निर्भयपणे खेळणे आवश्यक आहे. भारतीय संघाने बाहेर जाऊन आक्रमक खेळ करणे महत्त्वाचे आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या हे सर्व अपवादात्मक प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यांची षटकार मारण्याची क्षमता जबरदस्त आहे. संघ निवडताना संतुलन राखणे महत्त्वाचं असल्याचं गांगुली यांनी सांगितले.

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज! राज्यातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष

हरभजन सिंगने निवड केलेल्या 15 खेळाडूंची नावं

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, रिंकू सिंग, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, आवेश खान, अर्शदीप सिंग, मयंक यादव

विश्वचषकासाठी पात्र ठरलेले 20 संघ

अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा 

गटवारी 
अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ

भारतीय संघाचे वेळापत्रक
5 जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा 
इतर बातम्या
Join Whatsapp Group