टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, कोण आहे कॅप्टन?
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, कोण आहे कॅप्टन?
img
Dipali Ghadwaje
बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने आगामी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. 

दरम्यान हरमनप्रीत कौर हीच्याकडे भारतीय संघाचं नेतृत्व आहे. तर सांगलीकर स्मृती मनधाना ही उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. तसेच श्रेयांका पाटील आणि विकेटकीपर बॅट्समन यास्तिका भाटीया या दोघांचाही समावेश मुख्य संघात करण्यात आला आहे.

मात्र या दोघी दुखापतग्रस्त आहेत. दोघीही दुखापतीतून सावरत आहेत. मुख्य स्पर्धेआधी या दोघी पूर्णपणे फीट झाल्या तरच यांना वर्ल्ड कपसाठी खेळता येईल, अन्यथा दोघांच्या जागी दुसऱ्या खेळाडूंना संधी दिली जाईल. त्यामुळे या दोघींसमोर स्वत:ला फिट करण्याचं आव्हान असणार आहे.

  हेही वाचा >>>> तरुणीचा निर्घृण खून, डोकं, हात-पाय धडापासून कापले अन्..... ; कुठे घडला हा धक्कदायक प्रकार


वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर : 



कस आहे स्पर्धेचं आयोजन? 

स्पर्धेचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं आहे. एकूण 8 संघ स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले. तर श्रीलंका आणि स्कॉटलँडने पात्रता फेरीतून स्थान मिळवलं. अशाप्रकारे या स्पर्धेत एकूण 10 संघात वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे.

या 10 संघांना 5-5 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. टीम इंडियासह या ग्रुपमध्ये पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंकेचा (क्वालिफायर 1) समावेश आहे. तर बी ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांग्लादेश आणि स्कॉटलँड (क्वालिफायर 2) हे 5 संघ आहे.

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेआधी 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान एकूण 10 सराव सामने होणार आहेत. त्यानंतर 3 ते 20 ऑक्टोबर या 18 दिवसांमध्ये एकूण 23 सामने होणार आहेत. प्रत्येक संघ साखळी फेरीत 4 सामने खेळेल. दोन्ही गटातून अव्वल 2 संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरतील. सेमी फायनलचा पहिला-दुसरा सामना हा अनुक्रमे 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर 20 ऑक्टोबर रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडियाचं वर्ल्ड कप वेळापत्रक

विरुद्ध न्यूझीलंड, 4 ऑक्टोबर, संध्याकाळी 7.30 वाजता, दुबई

विरुद्ध पाकिस्तान, 6 ऑक्टोबर, दुपारी 3.30, दुबई

विरुद्ध श्रीलंका, 9 ऑक्टोबर, संध्याकाळी 7.30 वाजता, दुबई

विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 13 ऑक्टोबर, संध्याकाळी 7.30 वाजता, शारजाह

टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृति मनधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर)*, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील* आणि सजना सजीवन.
इतर बातम्या
Join Whatsapp Group