विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. खराडी भागात मुळा, मूठा नदी पात्रात एका तरुणीचा मृतदेह सापडला आहे. शिरच्छेद झालेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला. अत्यंत क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आली. तरुणीच डोकं, हात-पाय धडापासून वेगळे करण्यात आले होते. मृत तरुणी 18 ते 20 वयोगटातील आहे. हत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी अज्ज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
हत्या झालेल्या तरुणीचे वय अंदाजे 18 ते 20 वर्ष इतके असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, खराडी परिसरात एका कन्स्ट्रक्शनचे काम सुरु आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना नदीपात्राजवळ एक मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच चंदननगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता हा मृतदेह एका तरुणीचा असल्याचं दिसून आलं.
धक्कादायक बाब म्हणजे, मृतदेहाला हात, पाय नव्हते. तसेच शीर देखील धडावेगळं करण्यात आलेलं होतं. पोलिसांना फक्त तरुणीचे धड सापडले असून मृतदेहाची ओळख पटवणे सुरु आहे. अज्ञात व्यक्तीने तिची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे तुकडे केल्याचं समोर आलंय.
याप्रकरणी चंदनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून मृतदेहाची ओळख पटवणे सुरू केले आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.