ट्रेडमिलवर व्यायाम करताना महिला अचानक तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडली, उपचारा दरम्यान मृत्यू  ; कुठे घडली घटना
ट्रेडमिलवर व्यायाम करताना महिला अचानक तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडली, उपचारा दरम्यान मृत्यू ; कुठे घडली घटना
img
Dipali Ghadwaje
जिममध्ये  व्यायाम करताना एका महिलेने आपला जीव गमावला आहे. ही घटना इंडोनिशयातील पोंटियानाक येथील आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेचे फुटेज देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महिला 18 जून रोजी जिममध्ये गेली. नेहमी प्रमाणे महिला तिसऱ्या मजल्यावर असलेल्या ट्रेडमिलवर व्यायाम करत होती. महिला सुमारे ३० मिनिटे व्यायाम करत होती. ट्रेडमिलमधून उतरताच दोन पावले मागे जाते आणि थेट खिडकीतून बाहेर पडते. महिला स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करते परंतु ती वाचू शकली नाही. खिडकी उघडी असल्याने महिला जमिनीवर कोसळली.

इमारतीवरून खाली पडल्यानंतर जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि डोक्याला दुखापत झाल्याने रक्तस्त्राव होत होता. गंभीर दुखापतीमुळे महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिस या संदर्भात अधिक चौकशी व तपासणी करत आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group