नमाज पठणासाठी आलेल्या तरुणावर कोयता हल्ला; सीसीटीव्ही फुटेज समोर
नमाज पठणासाठी आलेल्या तरुणावर कोयता हल्ला; सीसीटीव्ही फुटेज समोर
img
Dipali Ghadwaje
पुणे : पुण्यात येरवडा परिसरात पुन्हा कोयता गॅंगने दहशत माजवल्याचे प्रकार  संपायचं नाव घेत नाही आहेत. त्यातच नमाज पठण करण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आलं आहे. 

याबाबत मिळलेल्या माहितीनुसार, येरवडा येथे कामगार नगरमध्ये बजरे मज्जित  येथे नमाज पठण करण्याकरिता एक जण आला होता. त्यावेळी त्याच्यावर कोयता हल्ला करण्यात आला. 

पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचे समजत आहे. दोन गटात भांडण होते  एक जण कोयत्याने मारहाण करिता त्याच्या अंगावर धावून गेला होता तो मज्जिदमध्ये पळ घेतल्यामुळे त्याचा जीव वाचला.

आरोपी त्या ठिकाणी फिरत होते. सीसीटीव्ही फुटेटमध्ये पाच सहा जणांच्या हातामध्ये कोयता दिसत आहे. पोलीस CCTV च्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत.

 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group