कुख्यात गँगस्टर आणि मुंबई बॉम्बस्फोट खटल्याशी संबंधित आरोपी अबू सालेम सध्या मुंबईच्या तळोजा कारागृहात आहे. मात्र या कारागृहामध्ये अबू सालेमच्या जिवाला धोका असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्याला नाशिकच्या कारागृहात हलवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुख्यात गँगस्टर आणि मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेम सध्या मुंबईच्या तळोजा कारागृहात आहे. या कारागृहात त्याला धोका असल्याचे बोलले जात आहे. तळोजा कारागृहाच्या अंडा सेलमध्ये अबू सालेम याला ठेवण्यात आले आहे.
या अंडा सेलच्या भिंती कमकुवत झाल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे या अंडा सेलची दुरुस्ती प्रस्तावित आहे. अबू सालेमला सध्या नवी मुंबईच्या तुळजा कारागृहात सुरक्षेच्या दृष्टीने धोका आहे. त्यामुळे त्याला नाशिकच्या कारागृहात हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या आठवड्याभरात याबाबतचा निर्णय होईल. हा निर्णय झाल्यास नाशिकच्या कारागृहाची सुरक्षितता वाढवावी लागणार आहे.
अबू सालेम कुख्यात दहशतवादी आहे. त्याच्यावर विविध खटले सुरू आहेत. सध्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात त्याला शिक्षा झाली आहे.अबू सालेमवर मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात त्याला शिक्षा झाली आहे. सालेमला १९ वर्षांपूर्वी पोर्तुगालमध्ये अटक करण्यात आली होती. वादग्रस्त अभिनेत्री मोनिका बेदी हिच्यासह त्याला भारतात आणण्यात आले होते.
त्याला प्रारंभी अर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते. ऑर्थर रोड कारागृहात अबू सालेमवर हल्ला झाल्याने तळोजा कारागृहात हलवण्यात आले होते. आता तळोजा कारागृहातील अंडा असेल सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याच्या कारणामुळे त्याला नाशिक कारागृहात हलवण्याची शक्यता आहे.