नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):-मुबंईमधील साखळी बॉम्बस्फोटमधील प्रमुख आरोपी आबू सालेमला आज पहाटे नाशिकरोड कारागृहातून रेल्वेने दिल्ली येथे नेण्यात आले. यावेळी नाशिकरोड कारागृह ते रेल्वे स्थानक दरम्यान मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मुबंईमध्ये 1993 साली साखळी बॉम्बस्फोट झाले होते. अनेक निष्पाप लोक यात मृत्यूमुखी पडले होते. या घटनेने सर्व देश हादरले होते. मुबंई पोलिसांनी यातील प्रमुख आरोपी आबू सालेमला शोधून काढले. तपासात आबू सालेम हाच या बॉम्ब स्फोटचा प्रमुख आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्याचबरोबर मुंबईमधील सिनेसुष्टीतील मोठमोठ्या कलाकारांना, दिग्दर्शकांना धमक्या देऊन खंडणी उकळत असे, यात अनेक लोकांना त्याने जीवे ठार मारल्याने त्यावर गुन्हे आहेत.
यातील मुंबई बॉम्बस्फोटामध्ये व इतर गुन्ह्यात न्यायालयाने त्यास कठोर शिक्षा सुनावली आहे. तर काही गुन्हे हे न्याय प्रविष्ट आहेत. यापूर्वी तो तळोजा कारागृहात होता, त्यास काही दिवसापूर्वी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले होते. मुंबई येथील विशेष पोलीस पथकांनी आज पहाटे तीन वाजेला गाडी क्र 1057 सीएसटी ते अमृतसर गाडीने नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरून आबू सालेमला मोठ्या बंदोबस्तात दिल्ली येथे न्यायालय कामासाठी नेण्यात आले. यावेळी कारगृह ते रेल्वे स्थानक दरम्यान मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.