भारतीय नेमबाज सिफ्ट कौरची सुवर्ण कामगिरी, नेमबाजीत देशाला मिळाले आणखी एक सुवर्णपदक
भारतीय नेमबाज सिफ्ट कौरची सुवर्ण कामगिरी, नेमबाजीत देशाला मिळाले आणखी एक सुवर्णपदक
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : आशियाई स्पर्धेमध्ये भारताच्या खात्यात १८ व्या पदकाची भर पडली आहे. ५० मीटर रायफल स्पर्धेत भारताच्या सिफ्ट कौर सामराने सुवर्णपदक पटकावले आहे, तर भारताची नेमबाज आशी चौक्सीनं कांस्यपदक मिळवलं आहे. दरम्यान, भारताच्या खात्यात 5 सुवर्ण, 5 रौप्य आणि 8 कांस्यपदक अशी एकूण 18 पदकं आली आहेत.  

भारताची नेमबाज सिफ्ट कौरनं 50 मीटर रायफल इव्हेंटमध्ये देशाला पाचवं गोल्ड मिळवून दिलं आहे. याच इव्हेंटमध्ये चीननं दुसऱ्या क्रमांकावर राहून रौप्यपदक आपल्या नावे केलं. तर भारताच्या आशी चौक्सीनं 50 मीटर रायफल इव्हेंटमध्ये कांस्यपदक पटकावलं आहे. 

सिफ्ट कौरनं केला विश्वविक्रम
50 मीटर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या सिफ्ट कौरनं 469.6 गुणांसह विश्वविक्रम केला. या विक्रमासह सिफ्टनं 462.3 गुणांसह चीनच्या झांग क्विओंग्यूचा पराभव केला. अशा प्रकारे सिफ्टनं मोठ्या फरकानं सुवर्ण जिंकलं. तर आशी चोक्सीने 451.9 गुणांसह कांस्यपदक जिंकले. आशीच्या खराब शॉटनं तिला रौप्यपदकापासून दूर ठेवलं, त्यानंतर तिला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. भारताच्या पारड्यात सिफ्टनं आणखी एका गोल्डची भर घातली असून भारताला आतापर्यंत पाच सुवर्णपदकं मिळाली आहेत. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group