आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला तिसरे सुवर्णपदक मिळाले आहे. घोडेस्वारी टीमने पदकावर नाव कोरलेय. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या घोडेस्वारी पथकाने 41 वर्षांनतर गोल्ड पदक मिळवत इतिहास रचलाय.
भारतीय घोडेस्वारी सुदीप्ती हजेला, दिव्यकृती सिंह, अंशु अग्रवाल आणि हृदय छेडा यांनी शानदार कामगिरी करत पदक पटकावले. आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारी खेळामध्ये 40 वर्षांच्या इतिहासात भारताने प्रथमच सुवर्णपदकावर नाव कोरले आहे.
भारताचे घोडेस्वार अनुष, सुदीप्ती, दिव्यकीर्ती आणि हृदय यांनी अंतिम फेरीत चमकदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात भारताच्या टीमने 209.205 गुण मिळवले. दिव्यकीर्तीला 68.176 गुण, हृदयला 69.941 गुण आणि अनुषला 71.088 गुण मिळाले. भारतीय संघ चीनपेक्षा 4.5 गुणांनी पुढे होता.