मुंबई पुण्यात आज ऑरेंज अलर्ट जारी; तुमच्या शहरातील काय स्थिती जाणून घ्या
मुंबई पुण्यात आज ऑरेंज अलर्ट जारी; तुमच्या शहरातील काय स्थिती जाणून घ्या
img
Dipali Ghadwaje
गेल्या 2 दिवसांपासून मुंबई उपनगराला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. आज देखील मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिमझिम सुरु आहे. हवामान विभागाने आज मुंबईसह पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.तसेच रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

तर ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.  रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

या भागात पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केलं आहे. तर हवामान विभागाने आज मुंबई, पुणे, रायगड, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. 

मुंबईत पावसाची संततधार कायम आहे. ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि विदर्भ या भागांत हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

तर उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यात आज ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुण्यात उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

कोल्हापूर आणि सातारा या भागांत सततच्या सुरु असणाऱ्या पावासामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीला पूर आला आहे. नदीची पाणी पातळी ही ४० फुटांवर गेली आहे. तर ७८ बंधारे पाण्याखाली आहेत. पुरामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे.
 

  
इतर बातम्या
Join Whatsapp Group