आनंदवार्ता..! Apple iPhone झाले स्वस्त, प्रो, मॅक्स मॉडेल्सची नवी किंमत काय? आताच जाणून घ्या
आनंदवार्ता..! Apple iPhone झाले स्वस्त, प्रो, मॅक्स मॉडेल्सची नवी किंमत काय? आताच जाणून घ्या
img
Dipali Ghadwaje
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै रोजी मोबाईल फोन, चार्चर यांच्यावरील सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी तशी घोषणा केली.

दरम्यान, या घोषणेनंतर आता जगप्रसिद्ध अॅपल या कंपनीने मोबाईल फोनची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने आयफोनच्या सर्वच सिरिजवरील किंमत 3 ते 4 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. केंद्राने सीमा शुल्कात 20 ते 15 टक्के घट केल्यानंतर अॅपलने हा निर्णय घेतला आहे.

आयफोन 13, 14 आणि 15 च्या किमतीत झाली घट 
ॲपल  कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आता या कंपनीच्या प्रो, प्रो मॅक्स यासारखे महागडे फोन 5100 रुपयांपासून ते 6000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत.  मेड इन इंडिया आयफोन  13, 14 आणि 15च्या दरातही साधारण 300 रुपयांपर्यंत घट झाली आहे. यासह आयफोन एसईच्या किमती 2300 रुपयांनी कमी झाल्या आहेत. ॲपल कंपनीने पहिल्यांदाच आपल्या प्रो मॉडेल्सच्या किमतीत घट केली आहे. 

आयफोनचे नवे दर काय?  

आयफोन एसई  - 47600 रुपये 
आयफोन13- 59,600 रुपये 
आयफोन 14 - 69,600 रुपये 
आयफोन 14 प्लस  - 79,600 रुपये 
आयफोन 15  - 79,600 रुपये 
आयफोन 15 प्लस  - 89,600 रुपये 
आईफोन 15 प्रो  - 1,29,800 रुपये 
आयफोन 15 प्रो मॅक्स  - 1,54,000 रुपये

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group