येत्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक
येत्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक
img
Dipali Ghadwaje
मागील काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बदलापूर येथील चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादवून टाकलं आहे. अत्याचाराच्या या घटनेविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. 

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भातील माध्यमांना माहिती दिली. मुंबईत आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना खासदार संजय राऊत, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, भाई जगताप, खासदार वर्षा गायकवाड आणि नसीम खान यांची उपस्थिती होती. 


या बैठकीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. "आजच्या बैठकीत आम्ही कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. कारण, महाराष्ट्र मनाने अस्वस्थ असून पेटलेला आहे. त्यामुळे आम्ही फक्त कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा केली. सरकारने तातडीने महिला अत्याचाराच्या घटना रोखाव्यात", असं संजय राऊत म्हणाले. 

येत्या 24 तारखेला आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला सर्व नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असं आवाहन देखील संजय राऊत यांनी केलं आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group