बँड पथकाच्या वाहनाच्या धडकेत युवक ठार ; नाशिक जिल्ह्यातील घटना
बँड पथकाच्या वाहनाच्या धडकेत युवक ठार ; नाशिक जिल्ह्यातील घटना
img
दैनिक भ्रमर
देवळा  : देवळा कळवण रोडवरील भऊर फाट्यावर मंगळवारी (दि १७ )रोजी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात खर्डे ता देवळा येथील अविवाहित तरुण  नितीन बाजीराव जाधव (२३) हा जागीच ठार झाला .देवळा पोलीस ठाण्यात रात्री उशीरा अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की , काल मंगळवार (दि.१७ ) रोजी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास खर्डे ता देवळा येथील नितीन जाधव (२३) हा युवक आपल्या दुचाकीने  घरी येत असताना देवळा कळवण रोडवरील भऊर फाटा नजीक बागलाण तालुक्यातील बँड पथकाचे वाहन वाहतुकीचे नियम न पाळता रस्त्यावर उभे असताना याची जबर धडक नितीन जाधव याला बसल्याने तो जागीच ठार झाला.

या घटनेची माहिती देवळा पोलिसांना मिळताच सपोनि दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन या अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या बँड पथकाच्या वाहनाला ताब्यात घेत चालकावर गुन्हा दाखल केला .अपघातात अविवाहित तरुण ठार झाल्याने खर्डे गावावर शोककळा पसरली आहे . वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून रस्त्यावर वाहन चलविणार्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी ,अशी मागणी नागरिकांनी केली आहे .

मयत नितीन जाधव वर देवळा ग्रामीण रुग्णालयात आज बुधवारी (दि १८) रोजी सकाळी ९ वाजता शवविच्छेदन करण्यात येऊन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले . नितीन यांच्या पश्चात आई ,वडील ,दोन बहिणी ,एक भाऊ असा परिवार आहे . 

deola |
इतर बातम्या
Join Whatsapp Group