देवळा (वार्ताहर) :- देवळा शहरात सप्तशृंगीनगरमध्ये गेल्या पंधरा दिवसांपूर्वी साडेपाच लाखांचे दागदागिने व रोकड चोरणाऱ्या दोघा आरोपींना पकडण्यात देवळा पोलिसांना यश आले आहे.
याबाबत माहिती अशी, की शांताराम राजाराम निकम (रा. सप्तशृंगीनगर, कळवण रोड, देवळा) यांच्या घरी झालेल्या चोरीचा सपोनि दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर हे करीत होते.
देवळा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर सहा पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी पोलीस उप निरीक्षक कैलास गुजर, पोलीस नाईक राहुल शिरसाठ, ज्योती गोसावी, योगेश जामदार, शरीफ शेख ,श्रीमती पवार यांच्या पथकाने सराईत घरफोडे सागर खंडेराव पिंपळकर (वय 20, रा. निवाणे), ज्ञानेश्वर संजय वाघ (वय 19, रा. सप्तशृंगीनगर, देवळा) यांना ताब्यात घेतले असता त्यांनी चोरीची कबुली दिली. 5 लाख 54, हजार 400 रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने सराफांना विकल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा 4,लाख 58,हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.