सोमवारी रात्री कुर्ल्यामध्ये बेस्ट बसचाअपघात घडला हा अपघात इतका भीषण हित कि यात ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली. कुर्ल्यातील अपघाताला ड्रायव्हरचा निष्काळजीपणाच जबाबादार असून भांडणातून हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.
कुर्ला बस अपघात घटनेचा प्राथमिक अहवाल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. या अहवालातील काही महत्वाचे मुद्दे न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अपघाताच्या काही मिनिटापूर्वी बस चालकाचे एक भांडण झाले होते. या भांडणातूनच ड्रायव्हरचा बसवरील ताबा सुटल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अहवालानुसार , कुर्ला स्टेशन बाहेरील जो टर्न आहे. हा 12 मीटर लांबीच्या बस वळवायला छोटा आहे. या जागी बस मागे पुढे करूनच काढावी लागते. ड्रायव्हरकडून बस वळवताना, तिथे असलेल्या रिक्षाला किरकोळ धडक लागली होती. स्पॉटवरील रिक्षा चालकांसोबत, ड्रायव्हरचा वाद झाला. त्यानंतर उभे असलेले रिक्षावाले बहुसंख्येने त्याच्या अंगावर गेले. त्यामुळे घाबरून ड्रायव्हरने गाडी दामटली आणि त्याचा ताबा गेला. त्यामुळेच एक्सेलेटरवर जोरात पाय दाबला गेला आणि बस नियंत्रणाबाहेर गेली.
दरम्यान, संजय मोरे हा बसचालक बेस्टमध्ये एक आठवड्यापुर्वी नियुक्त झाला.त्याचा इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव कमी होता.व्यवस्थित ट्रेनिंग झालं नसल्याचं अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे .कारण या बस खूप वेगाने आणि पटकन स्पिड घेतात. त्यावर नियंत्रण कसं राखावं,यावर ट्रेनिंग अत्यंत आवश्यक आहे. अपघात होण्याचं कारण बस फेल झाली, हे नाही. कारण जर बस फेल झाली तर ती जागीच थांबते,अशी या बसची तांत्रिक रचना आहे.