कुर्ला बेस्ट बस अपघातातील आणखी  एका जखमी व्यक्तीचा मृत्यू,  मृतांची संख्या 8 वर
कुर्ला बेस्ट बस अपघातातील आणखी एका जखमी व्यक्तीचा मृत्यू, मृतांची संख्या 8 वर
img
दैनिक भ्रमर
मागील आठवड्यात 9 डिसेंबर रोजी  मुंबईमधील कुर्ला बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती होती. दरम्यान आत मृतांचा आकडा ८ वर गेल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू आज झाला असल्याची माहिती मिळत आहे. अपघातात जखमी झालेल्या 55 वर्षीय व्यक्तीचा सोमवारी म्हणजेच आज मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आठ झाली आहे. 

कुर्ला परिसरातील गजबजलेल्या रस्त्यावर महानगरपालिकेद्वारे चालवल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) च्या इलेक्ट्रिक बसने सात जणांना चिरडले होते. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. अनेक वाहनांचेही नुकसान झाले. जखमींपैकी एकाचे नाव फजलू रहमान असे असून त्याचा सोमवारी मृत्यू झाला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी बेस्टने पाच सदस्यीय समिती स्थापन केली होती. बसचालक संजय मोरे पोलिसांच्या ताब्यात आहे. मोरेला इलेक्ट्रिक बस चालवण्याची परवानगी देण्यापूर्वी त्याला तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आल्याचा दावा बेस्ट प्रशासनाने केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group