शिर्डीत साईबाबा देवस्थानमध्ये बनावट पास विक्री ; कंत्राटी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
शिर्डीत साईबाबा देवस्थानमध्ये बनावट पास विक्री ; कंत्राटी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
img
DB
शिर्डीत येणाऱ्या भाविकांना पेड दर्शनपास देऊन फसवणूक झाल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. हे प्रकार घडत असल्याने साईबाबा मंदिर संस्थानने महत्त्वपूर्ण निर्णय घेत पेड दर्शनपास व आरती पाससाठी ओळखपत्र अनिवार्य केले करण्यात आले होते.

यामुळे जो साईभक्त पेड दर्शन पास घेईल किंवा ज्याला आरती करायची आहे; त्याच्याच नावाने ओळखपत्राची एन्ट्री करून पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. असे असताना देखील बनावट पास तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे.

शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन पास देण्यात येत असते. भक्तांना सशुल्क दर्शन पासच्या नावाने फसवणुकीचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी साई साईसंस्थानच्या प्रकाशन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्याविरोधात विविध कलमान्वये शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान  या प्रकरणाचा सखोल तपास होण गरजेचं आहे , अशी मागणी होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group