लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या. निवडणुकीत काँग्रेसचा मोठ्या पराभवानंतर नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण, पक्षाने ते मान्य केले नाही.
यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चा तीव्र झाल्या होत्या.तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे. अशा परिस्थितीत आता पृथ्वीराज चव्हाण यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, मला प्रदेशाध्यक्षपदात रस नाही. सध्या सुरू असलेल्या कोणत्याही चर्चेची मला माहिती नाही.
काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त पत्रकारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पदाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, मला प्रदेशाध्यक्ष पदात रस नाही. सध्या सुरू असलेल्या कोणत्याही चर्चेची मला माहिती नाही.
यावेळी त्यांनी असेही म्हटले की, या महिन्यात काँग्रेसला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळेल की नाही हे मला माहित नाही. पक्षाच्या नवीन कार्यालयाबद्दल बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आज काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन होत आहे याचा मला आनंद आहे.
काही नेते अप्रत्यक्षपणे नाना पटोले यांना दोष देत आहे आणि त्यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी करत आहे. तथापि, काँग्रेस हायकमांडने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. आता पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपद नाकारल्याचे समोर आले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर पक्षामध्ये निउत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्षपदासाठी बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यासह वरिष्ठ नेत्याच्या नावांची चर्चा असतानाच, आता पुन्हा एकदा पदासाठी नेमकी कोणाची वर्णी लागणार, आणि यासाठी नेमकं काय राजकारण होणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.