उद्या बंद आम्ही मागे घेतो आहे मात्र.... वाचा नेमकं काय म्हणाले नाना पटोले ?
उद्या बंद आम्ही मागे घेतो आहे मात्र.... वाचा नेमकं काय म्हणाले नाना पटोले ?
img
दैनिक भ्रमर
नाशिक - कोर्टाचा आदर ठेवून आम्ही उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे, मात्र काळे झेंडे दाखवून आणि काळे पट्टी बांधून आम्ही आंदोलन करणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाशिक मध्ये केली.

काँग्रेसच्या विभागीय बैठकीसाठी नाना पटोले हे नाशिक मध्ये आले होते. त्यानंतर शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या बंद बाबत न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, न्यायालयाच्या निर्णयाचा महविकास आघाडी आदर करत आहे. त्यासाठी म्हणून सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून ज्या ठिकाणी मिळेल त्या राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये तोंडाला काळी पट्टी आणि हातामध्ये काळे झेंडे घेऊन आंदोलन करण्यात येणार आहे. जर नागरिकांनी स्वतःहून दुकाने बंद केली तर ते आमचा कोणताही संबंध राहणार नाही तो नागरिकांनी पुकारलेला उत्स्फूर्त बंद असेल.

तसेच  दंगली होते म्हणून बंद बाबत निर्णय झाला असे म्हटले असता नाना पटोले यांनी सांगितले की चार दिवसापूर्वी नाशिक मध्ये काय झाले त्याची आठवण करून देत राज्यांमध्ये दंगलखोरच सरकार बसलेले आहे त्यामुळे दंगली होणारच यामध्ये कोणतीही दुमताची भावना नसावी, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group