GBS ने आता पुणेसह इतर जिल्यांमध्ये देखील हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून पुण्यात तर कहरच केला आहे. याचदरम्यान आता GBS निदान झालेल्या 26 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जीबीएसची लक्षणे आढळून आल्याने तरुणाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती गंभीर होऊन बुधवारी रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णाला जीबीएसचे निदान झाले होते. आज सकाळीच एका तरुणीने पुण्यात GBS मुळे जीव गमावला होता. त्यामुळे हा 24 तासातील दुसरा मृत्यू आहे.
राज्यात गुइलेन बॅर सिंड्रोम (GBS) आजाराच्या रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. मंगळवारी मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यातील रुग्णांची संख्या 211 वर पोहोचली असून, 183 रुग्णांना जीबीएसचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत राज्यात जीबीएसचा संसर्ग होऊन तब्बल 11 जणांनी आपला जीव गमावला आहे.
सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटीमध्ये हा 26 वर्षीय तरूण राहायला होता. GBS ची लागण झाल्याने 25 जानेवारी रोजी पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात या तरुणाला दाखल करण्यात आलं होतं . काल संध्याकाळच्या सुमारास या तरुणाचा झाला मृत्यू झाला आहे.