पुणे : GBS या आजारामुळे पुणेकरांची चिंता वाढलीये. सध्या राज्यात एकूण जीबीएस रुग्णांची संख्या 158 वर पोहोचलीये. यातील 21 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यात आतापर्यंत 5 रुग्णांचा GBS मुळे मृत्यू झालाय. तर सोलापूरातही एकाने जीव गमावलाय. आज एकाच दिवसात पुण्यात जीबीएसचे 10 रुग्णांची वाढ झालीये.
पुण्यात आतापर्यं एकूण 158 संशयित रुग्ण सापडले आहेत. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.आतापर्यंत 127 रुग्णांची GBS अहवाल आले आहेत. यापैकी 31 रुग्ण पुणे मनपा, 83 रुग्ण हे नव्याने पुणे मनपा अंतर्गत समाविष्ट केलेल्या गावामधील आहे.
18 रुग्ण प्रिपरी चिंचवड मनपा व 18 रुग्ण पुणे ग्रामीण आणि 8 रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. यापैकी आतापर्यत 38 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. 48 रुग्ण आयसीयुमध्ये आणि 21 रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत.