राज्यात अनेक ठिकाणी जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पुण्यासह आता इतर जिल्ह्यांमध्ये देखील हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आता या संदर्भात मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
जीबीएसचा हा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील यात्रांवर निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्यातील व बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच यात्रा यावर निर्बंध आणण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे आता जर रुग्णसंख्या वाढली तर कोणत्याही क्षणी निर्बंध येण्याची शक्यता आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, जीबीएस हा आजार जर गर्दीमुळे आणि संसर्गजन्य असल्याची माहिती मिळाली तर वैद्यकीय अधिकारी व प्रशासनाची बैठक घेऊन लवकरच राज्यातील व बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच यात्रा यावर निर्बंध आणण्याबाबत विचार सुरू असल्याचं संकेत प्रतापराव जाधव यांनी दिले आहेत
प्रतापराव जाधव पुढे म्हणाले, जीबीएस आजार मोठ्या प्रमाणात वाढत असून हा आजार काहीसा जीवघेणा ठरत आहे. त्यात जर जीबीएस हा आजार संसर्गजन्य असेल तर तात्काळ अधिकारी डॉक्टर यांची बैठक घेऊन राज्यात होणाऱ्या गर्दीच्या यात्रावर बंदी आणण्याचे संकेत दिले आहेत.
जीबीएसच्या वाढत्या प्रकरणांचे कारण कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आहे. कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीमुळे पोटात संक्रमण होते आणि तो जीबीएसच्या वाढीचे कारण ठरतोय. जीबीएस सामान्यत व्हायरल किंवा विषाणूच्या संसर्गानंतर होतो. दुषित किंवा कमी शिजलेले मांस, पाश्चर न केलेले दुग्दजन्य पदार्थ किंवा अशुद्ध पाण्याच्या सेवनाने या जीवाणूच लागण होते.