महत्वाची बातमी ! यूपीआय, पॅन कार्ड, पीएफ आणि क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल ; आत्ताच जाणून घ्या
महत्वाची बातमी ! यूपीआय, पॅन कार्ड, पीएफ आणि क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल ; आत्ताच जाणून घ्या
img
Dipali Ghadwaje
1 एप्रिल 2025 पासून तुमच्या जीवनाशी संबंधित अनेक महत्वाच्या वस्तुंचे नियम बदलले आहेत. याचा परिणाम सामान्य जनतेवर आणि तुमच्यावरही होणार आहे. 1 एप्रिलपासून कोणते बदल लागू होणार आहेत ते जाणून घ्या.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया  1 एप्रिल 2025 पासून निष्क्रिय किंवा दीर्घकाळ बंद असलेले मोबाईल नंबर निष्क्रिय करणार आहे. तुमच्या बँक खात्याशी जुना किंवा बंद नंबर लिंक असेल तर तुम्ही 1 एप्रिल 2025 नंतर तुम्हाला त्या नंबरवर यूपीआयचा वापर करता येणार नाही. तुमचे बँक खाते जुन्या किंवा निष्क्रिय मोबाइल नंबरशी जोडलेले असेल तर तुम्हाला बँकिंग आणि UPI सेवांमध्ये व्यत्यय येऊ शकतो.

जीएसटीशी संबंधित नियम

1 एप्रिलपासून जीएसटी नियमांमधील नवीन बदल लागू होतील. करदात्यांची सुरक्षा वाढविण्यासाठी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) पोर्टलवर आता मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन (एमएफए) अनिवार्य असेल. याशिवाय ई-वे बिल फक्त अशा आधार कागदपत्रांसाठी बनवले जाऊ शकेल ज्यांची 180 दिवसांपेक्षा जास्त जुने नाहीत.

जीएसटी नियमांमध्ये मोठा बदल

सरकारने 1 एप्रिल 2025 पासून इनपुट सर्व्हिस डिस्ट्रिब्युटर  प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रणाली राज्य सरकारांना एकाच ठिकाणी प्रदान केलेल्या शेअरिंग सेवांवर अचूक कर वसूल करण्यास मदत करेल. इनपुट सर्व्हिस डिस्ट्रिब्युटर किंवा आयएसडी ही एक अशी यंत्रणा आहे ज्याद्वारे कंपन्या त्यांच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये सामायिक सेवांवर मिळवलेले इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) योग्यरित्या वितरित करू शकतात. आयटीसी (इनपुट टॅक्स क्रेडिट) ही एक कर सूट आहे जी व्यवसाय त्यांच्या विक्रीवरील करातून खरेदी केलेल्या सेवा किंवा वस्तूंवर भरलेला जीएसटी वजा करण्यासाठी वापरू शकतात.

राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या नियमांमध्ये बदल

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने नॅशनल पेन्शन सिस्टम अंतर्गत युनिफाइड पेन्शन स्कीम  लागू करण्यासाठी नवीन नियम बनवले आहेत. हे नियम 1 एप्रिल 2025 पासून लागू होतील आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यूपीएस निवडण्याची पात्रता आणि प्रक्रिया निश्चित करतील.

किमान शिल्लक नियम

1 एप्रिलपासून एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक यासह अनेक बँकांमध्ये किमान शिल्लक रकमेशी संबंधित नवीन नियम लागू केले जातील. जर खात्यात निर्धारित किमान शिल्लक ठेवली नाही तर दंड भरावा लागू शकतो.

क्रेडिट कार्डचे नियम

1 एप्रिलपासून क्रेडिट कार्डचे नियमही बदलत आहेत. क्रेडिट कार्ड नियमांमधील बदल काही कार्डधारकांच्या रिवॉर्ड पॉइंट्स रचनेवर परिणाम करतील. एसबीआय सिम्पलीक्लिक आणि एअर इंडिया एसबीआय प्लॅटिनम क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना त्यांच्या रिवॉर्ड पॉइंट्स सिस्टममध्ये बदल दिसतील. तसेच एअर इंडियामध्ये विस्ताराचे विलीनीकरण झाल्यानंतर अॅक्सिस बँक त्यांच्या विस्तारा क्रेडिट कार्डचे फायदे अपडेट करेल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group