मागील सहा दिवसांपासून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे आंदोलन सुरू होते. अखेर आज सातव्या दिवशी बच्चू कडूंनी आंदोलन तुर्तास स्थगित केलं आहे. त्यांनी सरकारला 2 ऑक्टोबरची मुदत दिली आहे.
उपोषणामुळे बच्चू कडूंची प्रकृती खालावत होती. अन्नाचा एकही कण त्यांच्या पोटात गेलेला नाही. त्यामुळे बच्चू कडूंची प्रकृती खालावत असल्याचं समोर येतंय.
चार किलो वजन घटलं असून कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे. त्यांच्या या उपोषणाला माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी देखील पाठिंबा दिला आहे.
बच्चू कडू यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत?
- शेतमालाच्या किमान दरावर 20 टक्के अनुदान
- आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ आणि 10 लाखाची आर्थिक मदत तसेच संपूर्ण कर्जमाफी
- दिव्यांग आणि विधवा महिलांना 6000 रुपये मानधन द्या
- ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष, किमान 5 लाख अनुदान मिळावे
- धनगर समाजाचे आरक्षण तात्काळ लागू करणे
- धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत 13 टक्के आरक्षण