दुर्दैवी घटना...! शाळेतील वर्गातच साप चावल्यानं पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू
दुर्दैवी घटना...! शाळेतील वर्गातच साप चावल्यानं पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
शाळेतील वर्गात सर्पदंशानं पाचवीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार , वेदिका प्रकाश झाटे (वय ११) असं या मुलीचं नाव आहे. शाळेतील वर्गखोलीत विषारी साप कुठून आला? असा संशय आई-वडिलांनी व्यक्त केला आहे.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सोनाळे येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव या संस्थेच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये ही दुर्दैवी घटना घडली.

नेमकं काय घडलं? 

इयत्ता पाचवीत शिकणारी वेदिका प्रकाश झाटे (राहणार, बिलघर) ही नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. शाळेच्या मधल्या सुट्टीत तिला अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली.

वेदिका खाली कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर इयत्ता सातवीत शिकणारी तिची बहीण व अन्य दुसऱ्या विद्यार्थिनींनी वेदिकाला जागेवरून उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. घाबरलेल्या विद्यार्थिनींनी शाळेतील शिक्षकांना बोलावून हा प्रकार सांगितला. धक्कादायक बाब म्हणजे शिक्षकांनी तिला रूग्णालयात घेऊन न जाता तिला घरी घेऊन गेले, असा आरोप वेदिकाच्या आईवडिलांनी केला.

मुलीच्या वडिलांनी दुचाकीवरून तिला वाडा येथील रूग्णालयात नेले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. मुलीचा मृत्यूनं आईवडिलांना मोठा धक्का बसला. दुसऱ्या दिवशी वेदिकाचे मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. सर्पदंशाने तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालातून समोर आले.

शिक्षकांनी या विद्यार्थ्यांनीला शाळेला लागूनच असलेल्या रूग्णालयात घेऊन जाण्याऐवजी तिला घरी घेऊन गेले. जर तिला शाळेतूनच रूग्णालयात घेऊन गेले असते, तर कदाचित तिचा जीव वाचला असता, असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. बेजबाबदार शिक्षक व शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group