मागील काही वर्षांमध्ये थायलंडमध्ये हिंसाचाराच्या घटना वाढत आहे. थायलंडची राजधानी बँकॉकमधील एका बाजारात अंदाधुंद गोळीबार करण्यात आलाय. बँकॉकमधील लोकल फ्रेश फूड मार्केटमध्ये गोळीबार करण्यात आला.या गोळीबारामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोराने बाजारामध्ये अंदाधुंद गोळीबार केला आणि त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून घेतली. गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांपैकी चौघे त्या बाजारपेठेतील सुरक्षा कर्मचारी होते, असे म्हटले जात आहे. या गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्याचा तपास पोलीस करत आहे.
थायलंडमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ
१) मे २०२५ मध्ये यू थोंग जिल्ह्यातील बान डोनमध्ये एका ३३ वर्षीय व्यक्तीने अंदाधुद गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला.
२) ऑक्टोबर २०२३ मध्ये बँकाॅकमधील सियाम पॅरागॉन मॉलमध्ये एका १४ वर्षीय मुलाने गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता.
३) २०२२ मध्ये थायलंडच्या ईशान्या भागात एका बालसंगोपन केंद्रावर झालेल्या हल्ल्यात २४ लहान मुलांसह ३६ जणांचा मृत्यू झाला होता.